आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन सीमेवर १०० ब्राह्मोस, ४,३०० कोटी रुपयांचा खर्च येणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चीनच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. त्याअंतर्गत १०० अतिरिक्त ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्रे पूर्व सेक्टरमध्ये चीनच्या सीमेजवळ तैनात केली जातील. त्यासाठी ४,३०० कोटी रुपयांचा खर्च येईल.
संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, सरकारने अलीकडेच चौथी ब्राह्मोस रेजिमेंट तैनात करण्यास मंजुरी दिली. त्यात सुमारे १०० क्षेपणास्त्रे, १२ बाय १२ हेवी ड्यूटी ट्रकवर पाच मोबाइल ऑटोनॉमस लाँचर्स आणि एक मोबाइल कमांड पोस्ट यांचा समावेश असेल. त्याव्यतिरिक्त इतर काही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचाही समावेश असेल.

लष्कराने यापूर्वी अनेक वेळा ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे. मे २०१५ मध्ये पूर्व सेक्टरमध्ये तिची शेवटची जाहीर यशस्वी चाचणी झाली होती. ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या तीन तुकड्या याआधीच लष्करात सहभागी झाल्या आहेत. चीनकडून सातत्याने कुरापती काढल्या जात आहेत. घुसखोरीला त्यामुळे आळा बसणार आहे, असे संरक्षण विभागाला वाटते.
२९० किलोमीटर मारक क्षमता
‘स्टीप डाइव्ह कॅपॅबिलिटी’ अंतर्गत ब्राह्मोस पर्वतीय भागाच्या पाठीमागे लपलेल्या लक्ष्यावरही निशाणा साधू शकते. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता २९० किलोमीटर असून गती २.८ मॅक म्हणजे आवाजाच्या गतीपेक्षा तीन पट जास्त आहे. ते जमीन, समुद्र, विमान आणि पाणबुडीतूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.
बातम्या आणखी आहेत...