व्यक्तीमत्त्व आणि कामाचा विचार करता नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील सदस्य त्यांच्यासमोर ठेंगणे भासत आहेत. पंतप्रधानांनी जनतेकडे पाच वर्षांचा कालावधी मागितला असला तरी त्यांनी मंत्र्यांना 100 दिवसांचा अजेंडा मागितला होता. त्यांनी मंत्र्यांना काम करण्याची मोकळीक दिली आहे, पण शिस्तीत. कोणताही मंत्री पीएमओच्या परवानगीशिवाय मोठा निर्णय घेऊ शकत नाही. अशा परिस्थितीतही मंत्र्यांनी काही मोठे निर्णय घेतले. पण तरीही हे मंत्री वादांसाठी जास्त चर्चेत राहिले. मोदींच्या या मंत्र्यांचे काम कसे सुरू आहे, याचा घेतलेला हा आढावा...
मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाशी तुलना
यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात 80 मंत्री होते तर मोदींच्या मंत्रिमंडळात केवळ 46 मंत्री होते. पण त्याशिवाय या दोन मंत्रिमंडळांमध्ये 5 रंजक तुलनाही आहेत.
महिलांचे प्रमाण अधिक - मंत्रिमंडळात 24 पैकी 6 महिला (25%) आहेत. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात 28 पैकी केवळ 2 महिला (7%) होत्या.
कमी संपत्ती असणारे - मोदींच्या मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती 4.7 कोटी रुपये आहे. त्यात सर्वात श्रीमंत अरुण जेटली (113 कोटी) आहेत. तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाची सरासरी संपत्ती 13 कोटी होती.
सर्व देशात शिकलेले - नजमा हेपतुल्ला वगळता मोदींच्या मंत्रिमंडळाती सर्व मंत्र्यांचे शिक्षण देशात झालेले आहे. नजमा यांनी डेनवेर विद्यापीठातून पीएचडी केली आहे. त्याउलट मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचे सात सदस्य परदेशात शिकलेले होते. मनमोहन सिंग हे स्वतः ऑक्सफर्ड आणि कॅम्ब्रिज विद्यापीठात शिकले आहेत.
तरुण मंत्रिमंडळ - नव्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय 55.41 आहे. नजमा हेपतुल्ला (74) सर्वात वयस्कर आणि स्मृती ईराणी (38) सर्वात तरुण आहेत. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचे सरासरी वय 68 होते.
मोजकेच राजकीय वारसदार - मोदींच्या मंत्रिमंडळात कौटुंबीक राजकीय पार्श्वभूमी असणारे केवळ 3 मंत्री आहेत. मनेका गांधी, रविशंकर प्रसाद आणि हरसिमरत कौर बादल. तर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात असे 5 सदस्य होते.
पुढील स्लाइडवर वाचा मंत्र्यांना वेगवेगळी वागणूक...