आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ए, डी जीवनसत्त्वाचे 100 टक्के दूध मार्चपासून उपलब्ध होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘ड ’ युक्त (फोर्टिफिकेशन) दुधाची उपलब्धता नियोजित  वेळेपूर्वीच होणे अपेक्षित आहे. संघटित क्षेत्रात ६ ते ९ महिन्यांत १०० टक्के फोर्टिफाइड दूध विक्रीला उपलब्ध होईल. पहिल्यांदा संघटितच क्षेत्रासाठी दुधाला ५० टक्के फाेर्टिफाइड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. आता राज्यांच्या सहकारासारख्या संघटित क्षेत्रात सुमारे २५ टक्के दूध फोर्टिफाइड होते. टाटा ट्रस्टचे वरिष्ठ सल्लागार (न्यूट्रिशन) रंजन शंकर यांनी ही माहिती दिली.
 
फूड रेग्युलेटर एफएसएसएआय, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळ व सहकार क्षेत्राच्या सहकार्याने ही योजना अंमलात आणली जाणार आहे. फोर्टिफिकेशन प्रक्रियेतील गतीचे श्रेय तमिळनाडू, कर्नाटक, मध्य प्रदेशातील सहकार क्षेत्राला जाते, असे शंकर म्हणाले. दोन महिन्यात दुधात जीवनसत्त्व आणि इतर पोषण मूल्ये मिळण्यास सुरुवात होईल. हे दूध बाजारपेठेत ३० ते ४० टक्क्यापर्यंत पोहोचल्यावर इतरांवरही त्याबाबतचा दबाव पडेल. सध्या फोर्टिफाइड दूध केवळ शहरी भागात मिळते. ग्रामीण भागातील लोकांमध्ये सुक्ष्म पातळीवरील पोषण मूल्यांचा अभाव आढळून येतो. तो दूर करण्यासाठी ही रणनीती गरजेची आहे.

दुधाचे फोर्टिफिकेशन का असते गरजेचे?
दुधावरील प्रक्रियेत फॅटसोबत जीवनसत्व ही निघून जातात. खरे तर १९८० मध्ये फोर्टिफिकेशन योजनेला सुरुवात झाली होती. दुधात प्रथिने, कॅल्शियमसह अ आणि ड जीवनसत्व देखील असते. परंतु प्रक्रियेत फॅट निघून जातात. त्यासोबत तेही निघून जातात. म्हणूनच अनेक देशांत दुधात पुन्हा व्हिटॅमिन मिसळणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. सुरूवातीला तीन वर्षे योजनेचा खर्च सरकारने उचलला होता.
 
९७ टक्के लोकांना जीवनसत्त्वांची कमतरता
राष्ट्रीय पौष्टिकता नियामक मंडळ आणि आयसीएमआरच्या मते भारतातील लोकांत जीवनसत्व अ आणि ड प्रमाण खूप कमी असते. लहान असो की मोठे, शहरी किंवा ग्रामीण भागात ही कमतरता आढळून येते. दुधाचा वापर प्रत्येक वयातील लोक करतात. म्हणूनच त्यांची ही कमतरता दुधाद्वारे दूर करणे शक्य होणार आहे.

भारत सर्वात मोठा उत्पादक, विक्रीत मागे : जगातील एकूण दुधापैकी १८.५ टक्के दुधाचे भारतात उत्पादन होते. भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक आहे. २०१५-१६ मध्ये देशात १५.५५ कोटी टन उत्पादन झाले होते. अमेरिका दुसऱ्या स्थानी आहे. भारतात २० टक्के एवढेच संघटित दूध विक्रीचे क्षेत्र आहे.

एक लिटर दुधात व्हिटॅमिन मिसळण्यासाठी २ पैसे खर्च : दुधात व्हिटॅमिन ए आणि डी मिसळणे अतिशय सोपे आणि किफायतशीर आहे. देशात दोन्ही जीवनसत्त्वांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे. एक लिटर दुधात त्यांना मिसळण्यासाठी केवळ २ ते ४ पैसे एवढा खर्च येतो.

भारतात प्रतिव्यक्ती वापर ३२२ ग्रॅम दररोज अर्थात वार्षिक ११७ किलो
- १५० किलोहून अधिक - अमेरिका, युरोप, इस्रायल, पाकिस्तान, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.
- ३० -१५०  किग्रॅ.- भारत, इराण, जपान, मेक्सिको, न्यूझीलंड, उत्तर तसेच दक्षिण कोरिया, लॅटिन अमेरिका.
- ३० किलोहून कमी - व्हिएतनाम, सेनेगल, मध्य आफ्रिका, पूर्व-दक्षिण आशिया. (स्रोत : एफएआे)
 
बातम्या आणखी आहेत...