आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशद्रोहाची 105 प्रकरणे; शिक्षा केवळ दोन जणांना; झारखंड व बिहारमध्ये सर्वाधिक प्रकरणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशात गेल्या तीन वर्षांत देशद्रोहाची १०५ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. त्यापैकी १६५ जणांना अटक करण्यात आली तर ५३ जणांवर आरोपपत्र दाखल झाले. शिक्षा मात्र केवळ दोन जणांना झाली. देशद्रोहाची सर्वाधिक प्रकरणे झारखंड व बिहारमध्ये नोंदवण्यात आली आहेत. सर्वात जास्त अटकेची कारवाई देखील याच राज्यांतून झाली आहे. बिहारमध्ये दोन वर्षांत २५ खटले दाखल झाले आणि ६८ लोकांना अटक झाली.

केंद्रीय मंत्री राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी बुधवारी राज्यसभेत एका लेखी प्रश्नावरील उत्तरात दिली. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार २०१४ मध्ये ४७ खटले दाखल करण्यात आले होते तर ५८ जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी १६ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. परंतु शिक्षा मात्र कोणालाही झालेली नाही. २०१५ मध्ये ३० प्रकरणांत ७३ लोकांना अटक करण्यात आली. त्यापैकी १३ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. एकाला शिक्षा देण्यात आली. २०१६ मध्ये देशद्रोहाच्या आरोपात २८ प्रकरणे आहेत. त्यात उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालच्या आकड्यांचा समावेश मात्र नाही.दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये एक वर्षात १७२ दहशतवादी हल्ले झाले.