आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बलात्कारी बाबा राम रहीमची ‘माया’: हरियाणातील 18 जिल्ह्यांत डेराची 1093 एकर जमीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पानिपत- साध्वींचे लैंगिक शोषण करणाऱ्या राम रहीमच्या डेरा सच्चा सौदाच्या नावे हरियाणात १०९३ एकर जमीन आहे. याचे मूल्य ११५१ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येते. हरियाणातील १८ जिल्ह्यांत या जमिनी आहेत. या मालमत्तेचा अंदाजे तपशील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी तयार केला. जमिनीचे मूल्य जिल्हाधिकारी कार्यालयातील निर्धारित दराप्रमाणे काढण्यात आली आहे. अजून तरी डेऱ्याच्या जमिनीवर बांधकाम झालेल्या इमारतीची माहिती काढण्यात आलेली नाही. सार्वजनिक बांधकाम खाते या इमारतींचे मूल्य निर्धारित करेल. 
 
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, हरियाणा सरकारने २४ व २५ आॅगस्ट रोजी बाबाला दोषी ठरवल्यानंतर उसळलेला हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांनंतर झालेल्या नुकसानीची आकडेवारी काढण्यात आली आहे. यामध्ये लष्कर, निमलष्करी दल, प्रवासी सेवा व रेल्वे थांबल्याने झालेल्या नुकसानीची आकडेवारी यात समाविष्ट आहे.  सर्व मिळून सुमारे २०४ कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे नुकसान सरकार आता बाबाच्या मालमत्तेतून वसूल करणार आहे. या खर्चात  वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सरकारकडून जिल्ह्यातील लोकांच्या झालेल्या नुकसानीची आकडेवारी मागवण्यात आली आहे. यासाठी प्राथमिक माहिती अहवाल नोंदवून जिल्हाधिकारी कार्यालयास सविस्तर विवरण द्यावे लागणार आहे. या २०४ कोटी रुपयांत रोडवेजचे ३४ कोटी रुपये, उत्तर रेल्वे विभागाचे ५० कोटी, लष्कर व निमलष्करी दलाचे ४५ कोटी रुपये आणि पंचकुलासह हरियाणात झालेला हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांमुळे ७५ कोटी रुपयांचे नुकसान दर्शवण्यात आले आहे.  

सर्वाधिक ९५३ एकर जमीन सिरसा येथे; मूल्य १ हजार कोटी  : डेरा सच्चा सौदाचे मुख्यालय असलेल्या  सिरसा जिल्ह्यात एकूण ९५३ एकर जमीन असून या जमिनीपैकी तब्बल ९१ एकरांत डेरा बाबाचे निवास, माध्यमांचे केंद्र, कारखाने, बाग-बगिचे,रेस्टाॅरंट्स, माही सिनेमागृह, रुग्णालय, शाही मुलींचा आश्रम आणि आलिशान महाल उभे आहेत. डेराच्या अासपासची शहापूर बेगू, नजियाखेडा  आणि बेचिराग गावातील खांडावली येथे डेराची जमीन आहे. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, या सर्वांचे मूल्य जिल्हाधिकारी कार्यालयाने निर्धारित केलेल्या दरानुसार सुमारे एक हजार कोटी रुपये इतके सांगण्यात येते.  

नव्या डेराप्रमुखाच्या निवडीसाठी कुटुंबाची पहिली बैठक :जसमीतच्या नावावर सहमती
श्रीगंगानगर (राजस्थान)- डेरा सच्चा सौदाच्या एक हजार कोटींच्या मालमत्तेचा  वारसदार निवडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. डेरा प्रमुखाच्या मूळ गावी गुरुसरमोडिया येथे कुटुंबीयांनी पहिली बैठक घेतली. यात नवा डेरा प्रमुख म्हणून जसमीतच्या नावावर सहमती झाली आहे. या बैठकीबाबत गोपनीयता बाळगण्यात आली असून यामध्ये डेराप्रमुखाची आई नसीब कौर, पत्नी हरजित कौर आणि मुलगा जसमीत कौर यांची उपस्थिती होती. दोन मुली व दत्तक मुलगी हनीप्रीत या वेळी हजर नव्हती. त्यानंतर कुटुंबीयांनी रोहतक तुरुंगात असलेला डेरा प्रमुख राम रहीमला भेटण्यासाठी तुरुंगाधिकाऱ्याकडे वेळ मागितला आहे. डेराप्रमुखांनी संमती दिल्यानंतर नव्या डेराप्रमुखांच्या नावाची घोषणा केली जाईल.  

डेराप्रमुख व मुलामध्ये झाले होते वाद  
डेराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी न्यायालयाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी डेराप्रमुख व त्याचा मुलगा जसमीत यांच्यात वाद झाले होेते. नाराज झालेल्या जसमीतने मूळ गावी परत जाण्याची धमकीही दिली होती. मात्र, डेराप्रमुखाच्या कुटुंबासही निर्णय विरोधात जाणार असल्याची शक्यता वाटत होती. त्यामुळेच मालमत्तेच्या वाटणीसाठी निर्णय हवा होता. परंतु यावर डेराप्रमुखाने बोलण्यास नकार दिला.  

नालेसफाईत सापडली ८० छायाचित्रे
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सिंग यास साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून शिक्षा ठोठावण्यात आल्याने त्याच्या समर्थकांचा आता अपेक्षाभंग होऊ लागला आहे. श्रीगंगानगरच्या प्रमुख नाल्यातून बाबाची ७० ते ८० छायाचित्रे सापडली आहेत.

डेरा हिंसाचार : मृतांची संख्या ४० वर  
डेरा समर्थकांनी माजवलेला उत्पात, हिंसाचार व जाळपोळीच्या घटना व पोलिस गोळीबारात ठार झालेल्या मृतांची संख्या ४० झाली आहे. सिरसा येथील किशनकुमारचा मंगळवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला.
बातम्या आणखी आहेत...