आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इसिसच्या 12 हस्तकांना ११ दिवसांची कोठडी, वैजापूरच्या इम्रानचाही समावेश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - इसिस या दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक लोकांची भरती आणि त्यांना आर्थिक साह्य पुरवण्याच्या आरोपाखाली औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या इम्रान पठाणसह देशभरातून अटक केलेल्या इसिसच्या १२ हस्तकांची सोमवारी विशेष न्यायालयाने ५ फेब्रुवारीपर्यंत एनआयएच्या कोठडीत रवानगी केली.

विशेष न्यायाधीश अमर नाथ यांनी घेतलेल्या सुनावणीत १२ हस्तकांची ११ दिवसांच्या कोठडीत रवानगी केली. भारतातील इसिसच्या प्रचाराचा पर्दाफाश करण्यासाठी या सर्व हस्तकांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची आवश्यकता असल्याचे एनआयएने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे.