आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Parties Form \'alternative\' To Defeat Cong, BJP

जनतेला तिसरा पर्याय हवा, निवडणुकीनंतर आम्ही क्रमांक एकवर राहाणार - प्रकाश करात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाला भाजप एवढाच काँग्रेसचा धोका आहे. भाजपच्याही काँग्रेस सारख्याच निरर्थक घोषणा असून त्याचा देशाच्या धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे प्रकाश करात यांनी म्हटले आहे. आज (मंगळवार) त्यांनी दिल्लीत तिस-या आघाडीची घोषणा केली. त्यांच्यासोबत यावेळी जनता दल संयुक्तचे (जेडीयू) शरद यादव, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह होते. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांच्यासह 11 पक्षांचा तिस-या आघाडीत समावेश राहाणार आहे.
करात म्हणाले, आगामी निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वातील एनडीए आणि काँग्रेसप्रणीत युपीए आघाडीला धूळ चारणे हेच आमचे उद्दीष्ट आहे. त्यामुळेच डाव्या आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील जनतेला काँग्रेस आणि भाजप दोन्ही नको आहेत, त्यामुळेच आम्ही पर्याय देण्यासाठी मैदाना आलो, असल्याचे करात यांनी सांगितले. ते म्हणाले, देशाला तिसरा पर्याय हवा आहे. त्यामुळे युपीएला रोखण्यासाठी आणि मोदींना आव्हान देण्यासाठी तिसरी आघाडी एकत्रित निवडणूक लढविणार आहे.
आज आम्हाला तिसरी आघाडी संबोधले जात असले, तरी निवडणूक निकालानंतर आम्ही क्रमांक एकवर राहाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढील स्लाइडमध्ये, कोण कोण आहे तिस-या आघाडीत