आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल भागातील रस्ते बांधणीवर होणार 11 हजार कोटी रुपये खर्च

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: देशातील नक्षलग्रस्त भागाला रस्त्यांनी जोडण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहेत. त्यासाठी सुकमासह ४४ नक्षलग्रस्त जिल्ह्यांत रस्त्यांचा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. त्यावर ११ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  

११ हजार कोटींपैकी पाच टक्के अर्थात सुमारे ५५० कोटी रुपये प्रशासकीय, सुरक्षा दलावर खर्च होतील. नक्षलग्रस्त भागातील संपर्क वाढवण्यावर सरकारने भर दिला आहे. गेल्या वर्षी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नक्षलग्रस्त जिल्ह्यांना रस्त्याने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान, आेडिशा, झारखंड, बिहार, मध्य प्रदेश, तेलंगणा व महाराष्ट्रासह अनेक राज्यांना या नवीन योजनेचा लाभ मिळणार आहे. ही राज्ये या योजनेअंतर्गत येतात.  

१२६ पुलांची उभारणी  :  नक्षलग्रस्त भागातील रस्त्यांवर भर देताना केंद्राने ५ हजार ४११ किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचाही निर्णय घेतला आहे. या प्रकल्पाअंतर्गत १२६ पुलांची उभारणीदेखील केली जाणार आहे. त्यामुळे तिजोरीवर ११ हजार ७२४.५३ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.  
 
काही आठवड्यांत प्रत्यक्ष काम  
काही आठवड्यांत पायाभूत सुविधा बळकट करण्याचा हा प्रकल्प केला जाणार आहे. त्यासाठी सरकारने पुरेशी तयारी करून ठेवली आहे.  
 
गेल्या महिन्यात २५ सैनिक शहीद  
गेल्या महिन्यात नक्षलींनी केलेल्या हल्ल्यात २५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर केंद्र सरकारने पुढाकार घेऊन नक्षलींच्या बंदोबस्तासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू ठेवले आहेत.  
बातम्या आणखी आहेत...