आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 12 Andhra MPs Suspended In LS For Protesting Against Telangana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आंध्रचे 12 खासदार अखेर सस्पेंड, विरोधाला न जुमानता सरकारची कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- तेलंगणाच्या मुद्द्यावरून लोकसभेत सातत्याने कामकाजात अडथळा आणणा-या आंध्र प्रदेशच्या 12 खासदारांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या खासदारांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध असून ते अखंड आंध्रचे कट्टर समर्थक आहेत.

लोकसभेच्या सभापती मीरा कुमार यांनी आंध्रच्या बारा सदस्यांना निलंबित केल्याचे जाहीर केले. हे खासदार आंध्र व रायलसीमा भागातील आहेत. निलंबनाच्या कारवाईमुळे खासदारांना संसदेच्या पाच बैठकांना किंवा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार नाही. अर्थात यापैकी जो कालावधी कमी असेल तो लागू करण्यात येणार आहे. नियम 374 (अ) नुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अखंड आंध्रच्या समर्थकांवर निलंबनाची कारवाई करण्यासाठी गुरुवारी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी प्रयत्न केला. तेव्हा हा प्रयत्न विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी हाणून पाडला होता.