आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युपी : बलरामपूरमध्ये धुक्यामुळे जीप-बसची समोरासमोर धडक, 12 ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपघातानंतर जीपमध्ये अडकलेले मृतदेह. - Divya Marathi
अपघातानंतर जीपमध्ये अडकलेले मृतदेह.
बलरामपूर (युपी) - शनिवारी एक खासगी बस आणि जीप यांच्यात झालेल्या अपघातामध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर 10 जण जागीच ठार झाले तर दोघांनी हॉस्पिटलमध्ये प्राण गमावले. आणखी एक जणाची अवस्था गंभीर अशल्याचे सांगितले जात आहे. दाट धुक्यामुळे बस आणि जीपची समोरासमोर धडक झाली. सर्व मृत हे जीपमधील आहेत.

देवदर्शनाहून परतत होते मृत...
- हा अपघात सकाळी 9 वाजेच्या सुमारास झाला असल्याचे सांगितले जात आहे.
- अपघातात ठार झालेले सर्वजण जीपद्वारे नेपाळच्या प्रभुनाथ मंदिरामधून दर्शन करून परतत होते.
- तर बस श्रावस्तीहून कपिलवस्तूला जात होती. त्यात काही विदेशी पर्यटक बसलेले होते.
- अपघातात बसमध्ये बसलेले सर्व बचावले आहेत.

मृतांपैकी चौघांची ओळख पटली
- मृतांपैकी प्रदीप, प्रमोद, विजय आणि ननकू यांची ओळख पटली आहे.
- हे सर्व श्रावस्ती जिल्ह्याच्या सेमगढाचे राहणारे होते.
- पोलिसांनी मृतदेह पोस्ट मॉर्टमसाठी पाठवले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, Photos
बातम्या आणखी आहेत...