आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या द्वारकेत रावणाचा १२५ फूट पुतळा तयार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दसरा महोत्सवात रावण दहनाचा भव्य सोहळा अनुभवायचा असेल, तर दिल्लीतील द्वारका तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे. इथे रावणाचा १२५ फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे. दिल्लीमध्ये सर्वात मोठा रावणाचा पुतळा तयार केल्याचा आयोजकांचा दावा आहे. तसेच राजधानीत सर्वात मोठ्या रामलीला नाट्याचे आयोजन केल्याचा त्यांचा दावा आहे.

पुतळा तयार करण्यासाठी मोरादाबादच्या कलाकारांना बोलावण्यात आले आहे. पुतळ्याच्या उंचीमुळे दूरवर उभ्या लोकांना रावणदहन पाहता येणार आहे. लोकांचा दसरा संस्मरणीय करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी याआधी असा भव्य कार्यक्रम पाहिला नसेल, असा विश्वास श्रीरामलीला सोसायटीचे अध्यक्ष राजेश गेहलोत यांनी व्यक्त केला.

रामलीलेसाठी २०० फूट बाय ८० फुटी मंच
दहा एकर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रावण दहनानंतर कुंभकर्ण आणि मेघनादच्या पुतळ्याचे दहन होऊन दहा दिवसांच्या नवरात्री-दसरा उत्सवाची सांगता होईल. गेहलोत माजी नगरसेवक आणि द्वारकेतील मातियाला मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. या वर्षीच्या उत्सवातून शांतता आणि सौहार्दाचा पाळण्याचा संदेश आहे. रामलीला नाट्यासाठी २०० फूट लांब आणि ८० फूट रुंद मंच स्थापन करण्यात आला आहे.