आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीएसईच्या दहावीचा निकाल ९७.३२ टक्के, इथेही मुलींचीच बाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ म्हणजेच सीबीएसईने दहावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर केला. या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९७.८२ टक्के, तर मुलांचे प्रमाण ९६.९८ टक्के आहे. मात्र, १०० टक्के गुण म्हणजेच परफेक्ट १० स्कोअरमध्ये मुलांनी मुलींना यावर्षी मागे टाकले आहे. राज्याचा निकाल ९७. ३२ टक्के लागला आहे.

२०१०-११ मध्ये सीबीएसईने निरंतर सर्वंकष मूल्यांकन (सीसीई) लागू केल्यापासून निकाल ९० टक्क्यांपेक्षा जास्त लागत आहे; परंतु यंदाचा निकाल मागच्या वर्षीच्या तुलनेत १.५५ टक्क्यांनी घटला. २०१४ मध्ये निकाल ९८.८७ टक्के होता. यंदा तो ९७.३२ टक्क्यांवर आला. १३.७४ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
वेबसाइट ठप्प, विद्यार्थ्यांचे हाल
सीबीएसईने गुरुवारी दुपारी दोन वाजता आपल्या वेबसाइटवर निकाल जाहीर केला; परंतु वेबसाइटवरील ताण एवढा वाढला की वेबसाइट ठप्प झाली. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना अर्धा-अर्धा तास ताटकळावे लागले.
बातम्या आणखी आहेत...