आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खरीप हंगामात यंदा साडेतेरा कोटी टन उत्पादनाचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय कृषी मंत्रालयाने हंगाम संपण्याआधीच खरीप पिकांच्या चौथ्या आगाऊ अंदाजाची आकडेवारी सादर केली. त्यात, देशात खरीप पिकांचे उत्पादन या वर्षी १३ कोटी ५३ लाख टन अपेक्षित आहे. गेल्या वर्षीपेक्षा ते १ कोटी १२ लाख टनाने अधिक असणार आहे. डाळी व कडधान्यांची पेरणी यंदा देशभर अधिक प्रमाणात झाल्याने खरिपाच्या हंगामात त्यांचे ८७ लाख टनांचे उत्पादन अपेक्षित आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ५७ टक्क्यांची आहे. मात्र, ऊस आणि कापूस या दोन पिकांचे क्षेत्र यंदा घटल्याने उत्पादनही घटणार आहे.

२०१५-१६ च्या खरीप हंगामात दुष्काळी परिस्थितीमुळे देशात धान्य उत्पादन १२ कोटी ४० लाख टन झाले. त्या तुलनेत यंदाचे प्रमाण अधिक असल्याने डाळी, कडधान्ये, तेलबिया व धान्य इत्यादीच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली. धान्य उत्पादन वाढ त्यामुळे अपेक्षितच होती. धानाच्या पेरणीत ४ टक्के , डाळींच्या पेरणीत २९ टक्के वाढीमुळे तांदूळ उत्पादनात यंदा ११ लाख टनांची तर खरीप डाळींच्या उत्पादनात २५ लाख टनांहून थोडी अधिक भर पडणे अपेक्षित आहे.
बातम्या आणखी आहेत...