आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२६ सिंचन प्रकल्पांना १३ हजार कोटी; मराठवाड्यात ऊर्ध्व पैनगंगा, निम्न दुधनाला लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील २६ अपूर्ण सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी नाबार्डकडून १२ हजार ७७३ काेटी रुपये दीर्घ मुदीचे कर्ज देण्यात येणार अाहे. हे सर्व प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन याेजनेत समािवष्ट अाहेत. केंद्र अाणि राज्य सरकारमध्ये मंगळवारी याबाबतचा सामंजस्य करार झाला. याशिवाय हजार ८३० काेटी रुपयांचे अर्थसाहाय्यही सिंचनासाठी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दिल्लीतील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय जलसंसाधन सचिव शशी शेखर यांनी तीन राज्यासाेबत सामंजस्य करार केले. या बैठकीला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित हाेते. २७ जुलै २०१६ राेजी केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री कृषी सिंचन याेजनेत समाविष्ट असलेल्या देशातील ९९ माेठे मध्यम प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘दीर्घ मुदत सिंचन निधी’ निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. या निधीतून रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याची केंद्राची याेजना अाहे. या नुसारमंगळवारी महाराष्ट्र, छत्तीसगड अाणि तेलंगणा राज्याला दीर्घमुदतीचे कर्ज उपलब्ध करून देण्यासंदर्भात करार करण्यात अाला अाहे.

एप्रिल २०१२ राेजी िसंचन प्रकल्प पूर्ण करण्यसाठी करार करण्यात अाले हाेते. चार वर्षांपूर्वीच्या सामंजस्य कराराची किंमत त्यात २० टक्के वाढ असे केंद्रीय अर्थसहाय्य कर्ज स्वरुपात मिळणार अाहे. नाबार्डकडून देण्यात येणाऱ्या या कर्जाची मुदत ही १५ वर्ष असून व्याजाचा दर टक्के असणार अाहे. देशभरातील ९९ प्रकल्पांसाठी नाबार्ड ७७ हजार ५९५ काेटी उपलब्ध करून देत अाहे. त्यात सर्वाधिक १२ हजार ७७३ काेटी महाराष्ट्राला मिळणार अाहे.

महाराष्ट्रातील वाघूर, निम्न दुधना, तिलारी, निम्न पांझरा, नांदूर- मधमेश्वर टप्पा -२, गाेसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, उर्ध्व पैनगंगा, बेंबळा, तारळी, धाेमबलकवडी, अजुर्ना, उर्द्व कुंडलिका, अरुणा, कृष्णा-काेयना उसियाे, गडनदी, डाेंगरगाव, सांगाेला शाखा कालवा, खडकपूर्णा, वारणा, माेरणा (गुहागर), निम्न पेढी, वांग, नरवडे (महमद वाडी), कुडाळी या प्रकल्पांचा समावेश अाहे. या सर्व प्रकल्पांची एकूण सिंचन क्षमता ८, ५०, ७५२ हेक्टर अाहे. यापैकी २,९३,८६५ हेक्टर एवढी िसंचन क्षमता निर्माण झाली अाहे ५,५६,८८७ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...