नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीत मानवतेला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एका 25 नराधम काकाने त्याच्या 13 पुतणीवर बलात्कार केला आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने संपूर्ण घटनेचा 29 मिनिटांचा व्हिडिओ (MMS) बनवून
आपल्या मित्रांना पाठवून तो सार्वजनिक केला आहे.
दिल्ली महिला आयोगाच्या वकीलांने सांगितले की, या घटनेमुळे पीडित तरुणी प्रचंड भेदरली आहे. तिने आपला आई-वडिलांना या घटनेचे माहिती दिली नाही. पीडितेच्या एका मित्राने तिच्या आईला याविषयी माहिती दिली. कारण नराधम आरोपीने पाठवलेला कथित एमएमएस पीडितेच्या एका मित्रालाही आला होता. पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पीडितेचा काका असून तो त्यांच्या घरीच राहात होता. पीडिता घरी एकटी होती. याचा फायदा घेवून आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेवर रक्षाबंधन सणाच्या आधी पहिल्यादा आणि दिवालीच्यापूर्वी दुसर्यांदा असा दोनदा आरोपीने बलात्कार केला होता. आरोपीने पीडितेला जिवे ठार मारण्याची धमकीही दिली होती.
आरोपीने बलात्काराच्या व्हिडिओची क्लिप तयार करून काही मित्रांना पाठवला होता. त्यांनी त्यांच्या दुसर्या मित्रांना पाठवला. तेव्हा पीडितेच्या मित्राला कथित व्हिडिओ मिळाला. त्यानंतर या प्रकरणाचा भांडाफोड झाला.
पीडित तरुणीने नंतर तिच्या आईला आपबिती सांगितली. नंतर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन आरोपीला जेरबंद केले आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, फोन करून मुलींना आपल्या जाळ्यात फसवत होता आरोपी, नंतर त्यांचे अपहरण करून खंडणीही मागत होता..