आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 130 Dead In India For Sunstroke. Pictures See How Delhi Road Melt

देभरात उष्‍माघातचे 130 बळी...सूर्य ओकतोय आग; दिल्लीत अक्षरश: वितळला रस्ता!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एप्रिल महिन्यातच तापमानाने उच्चांक गाठला आहे. वाढत्या तापमानामुळे देशभरात उष्णतेची लाट आली आहे. देशात सर्वत्र नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होताना दिसत आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सूर्य आग ओकायला सुरुवात करतो ते संध्याकाळी सहाला थांबतो. दिवसभर घराच्या बाहेर पडणे नागरिकांना अवघड झाले आहे.

देशातील सात राज्यात गंभीर स्थिती...
दिल्लीसह ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील 7 राज्यांमध्ये पारा 40 अंश से‍ल्सियसच्या पलिकडे पोहोचला आहे. अजून उन्हाळ्याचे दोन महिने शिल्लक आहे. यंदाचा उकाडा आणखी असह्य होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

उष्माघाताने घेतला 130 जणांचा बळी...
उष्माघातामुळे देशात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे तेलंगणामध्ये सर्वाधिक 66 जणांचा तर ओडिशात 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणामध्ये पारा 44 अंश सेल्सियसपर्यंत चढला आहे. दिल्लीतही पारा 40 अंशांच्या पलिकडे पोहोचला आहे. उकाडा वाढत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये दुपारी रस्त्यांवर एकदम कमी वर्दळ दिसत आहे.

ओडिशाच्या काही भागांमध्ये काल तापमान 46 अंशांपर्यंत पोहोचले होते. परिणामी वाढता उकाडा आणि अपुर्‍या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेकडो गावांमध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. दरम्यान, 2015 हे मागील 135 वर्षातले सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा...
>तेलंगणात एवढं उन की फरशीवर अंडे फोडले तर तयार होते ऑमलेट...
>आग ओकणारा सूर्य व उष्णतेचा प्रकोप दर्शवणारे Photos...