आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्सशी राफालसह १४ करार, मात्र आर्थिक अडचणी कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारत आणि फ्रान्सने व्यूहात्मक भागीदारीला नवी उंची देत राफाल लढाऊ विमान खरेदीच्या करारावर शिक्कामाेर्तब केला. याबरोबर १३ अन्य करारांवरही सोमवारी स्वाक्षरी करण्यात आली. यामध्ये अंतराळ, रेल्वे, व्यापार, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्राचा समावेश आहे.

भारताच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. यानंतर करारावर स्वाक्षरी करण्यात आली. राफाल करारावर भारताकडून संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्वाक्षरी केली. मोदी यांनी यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले की, ३६ राफाल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी करार झाला आहे. असे असले तरी काही आर्थिक मुद्द्यांची लवकरच सोडवणूक केली जाईल.

मोदी यांनी फ्रान्स भारताचा अविभाज्य मित्र आणि सर्वांत जुना व्यूहात्मक भागीदार असल्याचे सांगितले. ते म्हणाले, दोन्ही देशांतील मैत्री काळाच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी व बळकट ठरली आहे. दहशतवाद हा मानवी मूल्यांचा शत्रू आहे. त्यामुळे अशा शक्तींना आश्रय देणे आणि आर्थिक तसेच अन्य मदत करणाऱ्या देशांविरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायाने निर्णायक कारवाई केली पाहिजे.
पुढील स्लाइड्सवर वाच, काय म्हणाले ओलांद...
- मोदी-ओलांद यांचा गुडगावपर्यंत मेट्राे प्रवास