आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी अधिवेशनात गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज 30 तास ठप्प, 14 विधेयक मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे कामकाजाचे जवळपास 30 तास वाया गेले. - Divya Marathi
लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे कामकाजाचे जवळपास 30 तास वाया गेले.
नवी दिल्ली - संसदेचे पावसाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. लोकसभेत झालेल्या गदारोळामुळे कामकाजाचे जवळपास 30 तास वाया गेले. वास्तविक सभागृहाने 10 तास अतिरिक्त काम करुन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आणि 14 विधेयके मंजुर झाली. 
 
पावसाळी अधिवेशनात सभागृहात 14 विधेयके मंजूर झाली. त्यात इन्स्टिट्यूट्स ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी (पब्लिक-प्राइव्हेट पार्टनरशिप) विधेयक, बँकिंग रेगुलेशन (अमेंडमेंट) विधेयक, कंपनी (अमेंडमेंट) विधेयक, मोफत आणि सक्तीचे शिक्षण कायदा विधेयक आणि राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँक (अमेंडमेंट)  विधेयक प्रमुख होते.
 
मॉब लिचिंगवर सर्वाधिक चर्चा 
- या अधिवेशनात देशातील कृषी क्षेत्राची स्थिती आणि जमावाकडून होणाऱ्या हिंसाचारावर (मॉब लिंचिंग) सर्वाधिक चर्चा झाली. 
 
17 जुलैपासून सुरु झालेल्या अधिवेशनात 19 बैठका 
- लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहकाचे कामकाज शुक्रवारी अनिश्चित काळासाठी स्थगित केले.  त्या म्हणाल्या,'17 जुलैपासून सुरु झालेल्या अधिवेशात 19 बैठकांमध्ये जवळपास 71 तास कामकाज चालले. सभागृहात झालेल्या गदारोळामुळे जवळपास 29 तास 58 मिनिटांचा वेळ वाया गेला. त्याचबरोबर सभागृहाने 10 तास 28 मिनिटे अतिरिक्त कामकाज करुन काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.'
बातम्या आणखी आहेत...