आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्ता दिली आता याकडे असेल दिल्लीकरांच्या नजरा, वाचा AAP ची 15 महत्त्वाची वचने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विधानसभा निवडणुकीतील भरघोस यशानंतर 'आप' दिल्लीत सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. 'आप'ने नागरिकांना अनेक महत्त्वाच्या मुद्यावर वचने देत पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. विशेष म्हणजे यावेळी केवळ पूर्ण बहुमत नव्हे तर जवळपास पूर्ण विधानसभाच मतदारांनी 'आप'च्या ताब्यात दिली आहे. त्यामुळे यावेळी 'आप'वर दिलेली वचने पाळण्यासाठी अधिक दबाव असणार आहे. आपने अनेक वचने दिलेली असली, तरी त्यापैकी दिल्लीकरांच्या जीवनाशी सर्वाधिक निगडीत असा महत्त्वाच्या 15 वचनांची आठवण आम्ही याठिकाणी करून देत आहोत.
'आप'ची महत्त्वाची वचने...

1. दिल्ली जनलोकपाल बिल
सत्तेत आल्यानंतर दिल्लीसाठी जन लोकपाल विधेयक आणणार असल्याचे आपने म्हटले होते. या लोकपालला भ्रष्टाचाराच्या प्रकरणाच्या तपासाचे आणि कारवाई करण्याचे अधिकार असतील.

2. स्वराज बिल
लोकांना अधिकार मिळावेत यासाठी स्वराज विधेयक आणणार असल्याचेही आश्वासन आपने दिले होते. राज्यातील नागरिकांवर प्रभाव पाडणारे निर्णय नागरिकांकडून घेतले जातील आणि प्रशासन त्यावर अंमलबजावणी करेल, असे याचे स्वरुप असेल.

3. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा
आपच्या प्रमुख वचनांपैकी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे वचन महत्त्वाचे आहे. त्यामुळे DDA, MCD आणि दिल्ली पोलिस अशा संस्था दिल्ली सरकारच्या अधिनस्त येतील.

4. वीज बिल अर्ध्यावर आणणार
कॅगकडे वीज कंपन्यांचे ऑडिट करण्याची विनंती करू आणि वीजबिव अर्ध्यापर्यंत खाली आणणार असल्याचे आपने म्हटले आहे.

5. वीजेसाठी पोर्टेबिलिटी सुविधा
आपने वीजेसाठी पोर्टेबिलिटी सुविधा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. वीज पुरवठादारांमध्ये स्पर्धा निर्माण करून वीजेचे दर खाली आणण्याचे आश्वासन आपने दिले होते.
'आप'ची इतर वचने वाचण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...