आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Pakistani Terrorists Enter India Through Rajasthan.

राजस्थान ATSचा सतर्कतेचा इशारा: देशात घुसले 15 दहशतवादी, मोठ्या घातपाताची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -राजस्थानमधून 15 दहशतवादी देशात घुसले असल्याचे राजस्थान एटीएसने म्हटले आहे. राजस्थान एटीएसने जारी केलेल्या सुचनेत हे दहशतवादी मोठा घातपात करण्याची शक्यता वर्तवली आहे. एटीएसच्या सुचनेनुसार, दहशतवादी जॅकेट बॉम्ब बनविणे, वाहनांचा स्फोट घडवून आणणे, डिव्हाइस तयार करणे आणि एके 47 सारखी शस्त्र चालवण्यात तरबेज आहेत. देशातील महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांना सतर्कतेचे आदेस देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात आजपासून (शुक्रवार) गणेशोत्सवाला सुरवात झाली आहे. राज्यातही सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
राजस्थान एटीएसच्या सुचनेनंतर राज्यातील जैसलमेर आणि बाडमेरसह पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेवरील चार जिल्ह्यांमध्ये गस्त वाढविण्यात आली आहे. एटीएसने 28 ऑगस्टला राज्याचे पोलिस महानिरीक्षकांना पत्र लिहिले आहे. त्यात दहशतवादी देशात घुसखोरी करण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्या दृष्टीने संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याची सुचना करण्यात आली आहे.
राजस्थानमार्गे का ?
गुप्तचरसंस्थाचे म्हणणे आहे, की जम्मू सीमेवर पाकिस्तानीकडून गेल्या काही दिवसांपासून सतत गोळीबार सुरु आहे. त्यासोबतच घुसखोरीचा देखील प्रयत्न होत आहे मात्र, त्यात त्यांना यश मिळालेले नाही. बीएसएफच्या कडक बंदोबस्तामुळे दहशदवाद्यांच्या प्रयत्न हाणून पाडण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे दहशतवाद्यांनी राजस्थानचा मार्ग निवडला असण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे मत आहे, की राजस्थानच्या सीमेवरुन दहशतवादी घुसखोरीत यशस्वी झाले तर, ते गुजरातमधूनही भारतात घुसण्याचा प्रयत्न करु शकतात. तर, बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले, की सीमेवरील गस्त वाढविण्यात आली असून गुप्तचर संस्थांही सक्रिय झाल्या आहेत.