आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 15 शाळांचा स्वच्छ विद्यालय पुरस्काराने गाैरव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वच्छतेच्या विविध मानकांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील १५ शाळांचा  राष्ट्रीय स्तरावरील ‘स्वच्छ विद्यालय’ पुरस्काराने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते शुक्रवारी नवी दिल्लीत सन्मान करण्यात आला.​​ प्रशस्तिपत्र आणि ५० हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मराठवाड्यातील नांदेड, बीड, परभणी जिल्ह्यातील शाळांनी प्रत्येकी एक, तर पुणे व अहमदनगर जिल्ह्यातील शाळांनी प्रत्येकी दोन पुरस्कार मिळवले.  

छावणी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, सचिव आनंद स्वरूप, अपर सचिव अनिता करवल या वेळी उपस्थित होते. तीन राज्ये, ११ जिल्हे आणि १७२ शाळांना या वेळी विविध श्रेणींमध्ये  गौरवण्यात आले. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने वर्ष देशभरातील सर्व शाळांना ‘स्वच्छता विद्यालय पुरस्कार’ स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार देशभरातील २ लाख ६८ हजार शाळांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. शाळांमध्ये पाण्याची उपलब्धता, शौचालयांची व्यवस्था, हात धुण्यासाठीची व्यवस्था आणि क्षमता विकास या मानकांवर  शाळांची निवड झाली. 

राज्यातील पुरस्कारप्राप्त शाळा  
मुलींची  शासकीय माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा, कोठाली (नंदुरबार), शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, किनवट (नांदेड), कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, धानोरा (गडचिरोली), एनएनएमसी माध्यमिक शाळा (ठाणे),  एससी मुलांची शासकीय निवासी शाळा, शिरूर (बीड), जिल्हा परिषद शाळा, उंडेमळा व नेप्ती (नगर), जिल्हा परिषद केंद्रीय मराठी प्राथमिक शाळा, धरणगाव (बुलडाणा), जिल्हा परिषद उर्दू शाळा , यशवंतनगर, टोनगाव (जळगाव), जिल्हा परिषद , विद्यानिकेतन, देवळा (नाशिक), जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शेंडेवाडी (सातारा), जिल्हा परिषद शाळा शिवनगर व बाहुली (पुणे), जिल्हा परिषद शाळा कोलवाडी (परभणी).
बातम्या आणखी आहेत...