आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 150 Country Ambassador Witness To Narendra Modi Oath Ceremony

मोदींच्या शपथविधीसाठी परराष्ट्र मंत्रालयाचे मिशन 150, अमेरिकेवर राहिल सर्वांची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे नियोजित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात जगभरातील सुमारे दिडशे देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने मिशन 150 अंतर्गत कामाला सुरवात केली आहे. अधिकृतपणे परराष्ट्र मंत्रालयाला हे लक्ष्य देण्यात आलेले नाही. परंतु, मंत्रालयाचा प्रयत्न आहे, की मोदींच्या शपथविधीला जास्तीत जास्त राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित राहावेत.
यात सर्वांचे लक्ष अमेरिकी प्रतिनिधींकडे लागले आहे. भारतातील अमेरिकी दूतावासात अद्याप राजदूत नियुक्त करण्यात आलेला नाही. त्यामुळे उप-राजदूत मायकल फ्लेटियर अमेरिकेचे प्रतिनिधीत्व करेल, असे दिसून येते. अमेरिकी राजदूत नॅन्सी पॉवेल काही दिवसांपूर्वीच भारत सोडून गेल्या असून नवीन राजदूत येण्यासाठी जुनपर्यंतचा कालावधी लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने या शपथविधी समारंभाला पहिल्या परिक्षेसारखे घेतले आहे. जगभरातील सर्व राष्ट्रांसोबत भारताचे चांगले संबंध आहेत, हे या निमित्ताने या मंत्रालयाला सिद्ध करायचे आहे. त्यामुळे या समारंभाला सुमारे दिडशे देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याच्या दिशेने परराष्ट्र मंत्रालयाने जोरदार मोहिम उघडली आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनी मिशन 150 चे लक्ष्य स्वतःच ठेवले आहे.
चीन आणि अमेरिकेच्या प्रतिनिधींकडे लक्ष
अमेरिकेचे प्रतिनिधीत्व कोण करेल, याची माहिती अद्याप अमेरिकी दूतावासातून देण्यात आलेली नाही. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नरेंद्र मोदी यांनी अरुणाचल प्रदेशातील चीनच्या घुसखोरीवर टिप्पणी केली होती. त्यामुळे चीनचे भारतातील राजदूतच या समारंभाला उपस्थित राहतील, असे दिसून येते. दुसरीकडे सार्क देशांप्रमाणेच मॉरिशसचे अध्यक्ष-प्रमुखांच्या आगमनासाठी विशेष तयारी केली जात आहे.
75+ नेते सरकारमध्ये नकोत, यासाठी संघाचा प्रयत्न.... वाचा पुढील स्लाईडवर