आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: 160 वर्षांची झाली भारतीय रेल्‍वे, जाणून घ्‍या महत्त्वाचे टप्‍पे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रेल्‍वेच्‍या इतिहासात 160 वर्षांपूर्वी मुहूर्तमेढ रोवली गेली. आजच्‍याच दिवशी 1953 मध्‍ये बोरीबंदर ते ठाणे रेल्‍वेने पहिला प्रवास केला होता. 21 मैलांचे हे अंतर कापण्‍यासाठी दुपारी 3.30 वाजता रेल्‍वेने बोरीबंदर स्‍थानक सोडले. त्‍यावेळी गाडीला 14 डब्‍बे होते. तर सुलतान, सिंध आणि साहिब हे तीन इंजिन त्‍यांना ओढत होते. पहिल्‍या प्रवासात 400 व्‍हीव्‍हीआयपींनी पहिल्‍या रेल्‍वेत प्रवास केला. पहिल्‍या रेल्‍वेला 21 बंदुकीच्‍या गोळ्यांची सलामी देण्‍यात आली होती. हा दिवस भारतासाठी अतिशय महत्त्वाचा होता. तेव्‍हापासून 160 वर्षांच्‍या कालावधीत भारतीय रेल्‍वेने अनेक स्थित्‍यंतरे पाहिली.

फोटोंमध्‍ये पाहा भारतीय रेल्‍वेच्‍या प्रवासातील महत्त्वाची स्थित्‍यंतरे...