आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 19 Girls Molested By Pt Teacher In Mcd School Say Police. News In Marathi

दिल्लीत पीटी शिक्षकाकडून 19 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्ली महानगर पालिकेच्या (एमसीडी) एका शाळेत 19 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शाळेतील पीटी शिक्षकांने हे कृष्णकृत्य केल्याचा आरोप करण्‍यात आला आहे. आरोपी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. शाळा प्रशासनाने आरोपीला तडकाफडकी निलंबित केले आहे. दिल्लीतील फतेहपूर बेरी गावात ही घटना घडली. दुसरीकडे, समुपदेशकाच्या मदतीने पीडित विद्यार्थिनींचा जबाब नोंदवण्याचे काम सुरु आहे.
एक्सरसाइजच्या बहाण्याने लैंगिक शोषण:
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लैंगिक शोधणामुळे घाबरलेल्या पीडित विद्यार्थिनींनी पालकांना 'आपबिती' सांगितली. नंतर पालकांनी शाळेसमोर आंदोलन करून आरोपी शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली. एक्सरसाइज करण्याच्या बहाण्याने आरोपी विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत असल्याची माहिती पालकांनी पोलिसांना दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून चौकशी सुरु केली आहे. शाळा प्रशासनने आरोपी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे.