आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचे १९ खेळाडू पॅरालिम्पिकसाठी रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारताचे१९ खेळाडू पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी रिओ दी जानेरिअाेला रवाना झाले आहेत. रिओत पॅरालिम्पिक स्पर्धा ते १८ सप्टेंबर या काळात होईल. भारताचे १९ खेळाडू स्पर्धांत सहभागी होतील.भारतीय खेळाडू अॅथलेटिक्स, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, तिरंदाजी आणि जलतरणात सहभागी होतील. भारताला पदकाची सर्वाधिक आशा भालाफेक आणि उंच उडीतून आहे.

भारताच्यानावे पदके : भारतानेआतापर्यंत १० पॅरालिम्पिक स्पर्धेत सहभागी होताना पदके जिंकली आहेत. मुरलीकांत पेटकरने भारतासाठी पहिल्यांदा १९७२ मध्ये सुवर्ण जिंकले. त्यानंतर देवेंद्र झाझारियाने २२ वर्षांनी भालाफेकीत सुवर्ण जिंकले.चार वर्षांपूर्वी गिरिशा नागाराजेक गौडाने उंच उडीत रौप्य जिंकले होते. यंदाही भारताला पदकाच्या आशा आहेत.
भारतीय खेळाडू असे
पूजा(तिरंदाजी), अंकुर धामा, (१५०० मी. रेस), मारियप्पन थान्गवेलू (उंच उडी), वरुणसिंग, शरककुमार, रामपाल चाहर (तिघे, उंच उडी), देवेंद्र झाझारिया, सुंदरसिंग गुर्जर (भालाफेक), करमज्योती दलाल (थाळीफेक), रिंकू, रणबीर नरेंद्र, संदीप सिंग मान (भालाफेक), अमितकुमार सरोहा, धरमबीर, वीरेंद्र धनकर, दीपा मलिक, फरमान बाशा, नरेश शर्मा, सुयश जाधव.
रिओत होणार ते १८ सप्टेंबरदरम्यान स्पर्धा
बातम्या आणखी आहेत...