(फाइल फोटो: माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा)
दिल्ली- माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांना तब्बल 39 वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टाने सोमवारी ललित नारायण मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी चार आरोपींनी दोषी ठरवले आहे. कोर्टाने आरोपी रंजन दिवेदी, गोपालजी, संतोषानंद आणि सुदेवनंद या चौघांना हत्यारे घोषित केले आहे. न्यायाधिश विनोद गोयल यांनी 39 वर्षे प्रलंबित खटल्यावर निर्णय सुनावला आहे. दोषींना 15 डिसेंबला शिक्षा सुनावली जाणार आहे.
काय आहे प्रकरण
बिहारमधील समस्तीपूर रेल्वे स्टेशनजवळ 2 जानेवारी 1975 रोजी आयोजित समारंभात झालेल्या बॉम्बस्फोटात तत्कालिन रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा गंभीर जखमी झाले होते. दुसर्या दिवशी अर्थात 3 जानेवारी 1975 ला मिश्रांचा मृत्यु झाला होता.
या खटल्यात 200 पेक्षा जास्त साक्षिदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. या हत्याकांडात सरकारी पक्षाने संतोषानंद अवधूत, सुदेवनंद अवधूत, रंजन द्विवेदी आणि गोपालजी या चौघांना आरोपी बनवले होते. सरकारी पक्षाने 161 तर बचाव पक्षाने 40 साक्षिदारांना कोर्टात साक्ष नोंदवल्या.
केंद्रीय अन्वेशन विभागाने (सीबीआय) पाटणा कोर्टात 1 नोव्हेंबर 1977 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. 1979 मध्ये सुप्रीम कोर्टाने हा खटला दिल्लीतील कडकडडूमा कोर्टात वर्ग केला. आरोपींनी एफआयआर रद्द करण्याची सुप्रीम कोर्टात मागणी केली होती. परंतु सुप्रीम कोर्टाने 17 ऑगस्त, 2012 रोजी आरोपींची मागणी फेटाळली. कडकडडूमा कोर्टात सप्टेंबर 2012 ला या खटल्याच्या सुनवाणीस सुरुवात झाली होती.
कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणार आरोपी...
माजी रेल्वेमंत्री ललित नारायण मिश्रा यांच्या हत्येप्रकरणी रंजन दिवेदी, गोपालजी, संतोषानंद आणि सुदेवनंद या चौघांना कोर्टाने दोषी ठरवले आहे. कडकडडूमा कोर्टाच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले जाणार असल्याचे दोषींच्या वकीलांनी सांगितले.