आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस नेते जगदीश टायटलरांच्या विरोधात नव्या तक्रारी नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस नेते जगदीश टायटलर यांच्याविराेधात कोणत्याही नव्या तक्रारी नसल्याची माहिती सीबीआयकडून दिल्ली न्यायालयात देण्यात आली आहे. १९८४ मध्ये उसळलेल्या शीखविरोधी दंगलीप्रकरणी साक्षीदारांना फितूर करणे तसेच बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपातून त्यांना आधीच क्लीन चिट देण्यात आली आहे. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रतापसिंह यांनी सांगितले की, पीडितांच्या अर्जांच्या आधारे न्यायालयाने वकिलास काही प्रश्न विचारले होते.

यात टायटलर यांच्याविरोधात कलम १९३ (खोटे साक्षीदार सादर केल्याबद्दल शिक्षा), १९५ अ (खोट्या साक्षीसाठी धमकी) आणि बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी खटला दाखल आहे काय? अशी विचारणा करण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी कोणताही वेगळा खटला दाखल केला गेला नसल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. दरम्यान, सीबीआयने तिसर्‍या क्लोजर रिपोर्टमध्येसुद्धा टायटलर यांना क्लीन चिट दिली होती. पीडितांनी त्यास आव्हान दिले आहे. याप्रकरणी ३० जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे. दरम्यान, पीडितांनी संरक्षण याचिकेसाठी चार आठवड्यांची मुदत मागितली आहे.
बातम्या आणखी आहेत...