आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 1984 Anti Sikh Riots: Verdict On Jagdish Tytler Today

1984 दंगल: जगदीश टायटलरांविरुद्ध नव्याने खटला चालवण्याचे कोर्टाचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- सन 1984मध्ये उसळलेल्या शीख दंगलीप्रकरणी कॉंग्रेसचे ज्येष्‍ठ नेते जगदीश टायटलर हे पुन्हा अडचणीत सापडले आहे. टायटलरांच्या विरोधात नव्याने खटला चालवण्याचे आदेश दिल्लीतील कड़कड़डूमा कोर्टाने बुधवारी दिले आहेत. टायटलर यांच्यावर खटला चालवण्यात येऊ नये, अशी विनंती याचिका दाखल करणार्‍या केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) कोर्टाने चांगलेच फटकारले आहे.

टायटलर यांच्यावर नागरिकांना भडकावल्याचा आरोप आहे. दंगलीवेळी नागरिकांनी बादल सिंह, ठाकूर सिंह व गुरुचरण सिंह यांची हत्या केली होती. सीबीआयने 2007 आणि 2009 मध्ये टायटलर यांना क्‍लीन चीटही दिली होती.

टायटलर यांच्या विरोधात नव्याने चौकशी करण्याचेही आदेश कोर्टाने सीबीआयला दिले आहेत.