आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी केली 1984 दंगलींची SIT चौकशी करण्याची मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (बुधवार) नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन 1984 मध्ये झालेल्या शीखविरोधी दंगलींची 'एसआयटी' चौकशीची मागणी केली आहे. तेसच राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवून खलिस्तानचा दहशतवादी देविंदरसिंग भुल्लरच्या माफीची मागणी केली आहे. 1993 मध्ये दिल्लीमधील बॉम्ब स्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाने भुल्लरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली आहे.
केजरीवाल दिल्ली राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही 1984 च्या दंगलीची एसआयटी मार्फत चौकशीची चर्चा करणार आहेत. केजरीवालांना कायम विरोध करणा-या भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा सहकारी पक्ष अकाली दलाने त्यांच्या या मागणीचे समर्थन केले आहे.
काँग्रेसच्या एक मोठ्या नेत्याने आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, एसआयटीवर प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले आहे. नुकत्याच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल गांधी यांनी 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलींसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरले होते तर, शीखविरोधी दंगलींत काँग्रेसचे काही नेते होते, याची जाहीर कबुली दिली होती.
केजरीवालांच्या मागणीचे कारण
केजरीवाल यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात 1984 च्या दंगलपीडितांना न्याय मिळवून देण्याची घोषणा केली होती. असेही बोलले जाते, की गुजरातमध्ये 2002 साली झालेल्या दंगलींची एसआटी चौकशी केली गेली त्याच आधारावर त्यांनी ही मागणी केली आहे. 1984 च्या दंगलपीडितांचे वकील आणि आम आदमी पार्टीचे सदस्य एच.एस.फुल्का यांचे म्हणणे आहे, की गेल्या तीस वर्षांमध्ये शीखविरोधी दंगलीची एसआयटी चौकशी झालेली नाही. अशी चौकशी झाली तर या खटल्याला गती येईल.

पुढील स्लाइडमध्ये, कोण आहे भुल्लर