आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 1984 Riots: Court Seeks CBI Reply On Allegation That Tytler Tried To Influence Witness

1984 शीख दंगल: अमिताभच्या जबाबामुळे टायटलर यांच्या अडचणीत वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहासमवेत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन. - Divya Marathi
इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर त्यांच्या मृतदेहासमवेत माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि अमिताभ बच्चन.
नवी दिल्ली- 1984 च्या शीख दंगलीप्रकरणी दिल्लीतील एका न्यायालयातील सुनावणीदरम्यान प्रथमच अमिताभ बच्चन यांच्या नावाचा उल्लेख झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते की, इंदिरा गांधींची हत्या झाली त्यावेळी दंगल भडवण्याचा ज्यांच्यावर आरोप झाला त्याक्षणी काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर कोठे होते याची मला माहिती नाही. शीख विरोधी दंगलीची चौकशी करीत असलेल्या सीबीआयला 15 जून 2013 रोजी अमिताभ यांनी ही माहिती दिली होती.
वरिष्ठ वकील एच एस फुल्का यांनी बुधवारी सुनावणीनंतर माध्यमांना सांगितले की, अमिताभ यांनी सीबीआयला सांगितले आहे की, 1 नोव्हेंबर 1984 रोजी मी इंदिरा गांधी यांच्या मृतदेहाजवळ तीन मूर्ती भवन येथे उपस्थित होतो. मला माहित नाही त्यावेळी टायटलर कोठे होते. अमिताभ यांचा हा दावा टायटलर यांना अडचणीत आणू शकते कारण टायटलर यांनी मी अमिताभ यांच्यासमवेत होतो असे सांगितले आहे.
सीबीआयला द्यायचे आहे कोर्टाला उत्तर-

या प्रकरणी सीबीआयने हे प्रकरण बंद करण्याची विनंती केली आहे. कोर्टाने सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याचबरोबर टायटलर यांच्याकडून एका साक्षीदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीबीआयने म्हणणे मांडावे असे कोर्टाने आदेश दिले आहेत. सीबीआयला 24 जूनपर्यंत याची माहिती कोर्टात द्यावी लागणार आहे. अतिरिक्त मुख्य मेट्रोपालिटन मजिस्ट्रेट एस पी एस लालेर यांनी सीबीआयद्वारे चौकशी सुरु असताना जेलमध्ये बंद असलेले उद्योगपती अभिषेक वर्मा यांच्या जबाबाबाबतही उत्तर देण्यास सांगितले आहे.
काय म्हटले होते वर्मांनी-
या दंगलीतील पीडितांचे प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ अधिवक्ता एच एस फुल्का यांनी कोर्टात सांगितले होते की, वर्मा यांनी सीबीआयला दिलेल्या आपल्या जबाबात म्हटले होते की, टायटलर यांनी याप्रकरणी मुख्य साक्षीदार सुरेंद्र कुमार ग्रंथी यांच्यासोबत सौदेबाजी केली होती. वर्मा यांनी सीबीआयला सांगितले की, सौदेबाजीनंतर काही काळातच सुरेंद्र याचा मृत्यु झाला. त्यासाठी मोठी रक्कम मोजली गेली. त्यांचा मुलगा नरेंद्र सिंह यांना परदेशात स्थायिक केले आहे.
टायटलर यांनी वर्माला हे ही सांगितले होते की, नरेंद्रने आपल्या पित्यावर यासाठी दबाव टाकावा की याप्रकरणाची साक्ष जगदीश टायटलर यांच्या बाजूने देण्यात यावी. वर्मा यांनी 2010 साली हा आरोप केला की, टायटलर यांनी त्यांची कॅनडात राहत असलेली बहिणीला पाच कोटी रूपये पाठवले होते. हा पैसा हवाला मार्फत पोहचवला गेला. मात्र जेव्हा ही रक्कम एका ट्रस्टच्या खात्यात पोहचली तेव्हा संबंधित बॅंकेने ते खाते गोठवले होते.
बातम्या आणखी आहेत...