आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल-कायदाच्या 2 संशयित दहशतवाद्यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल) - Divya Marathi
(फाईल)
नवी दिल्ली - स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच महत्वाच्या ठिकाणी चोख बंदोबस्त असताना दिल्लीत अल-कायदाच्या 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दोन वेग-वेगळ्या ठिकाणांवरून या दोघांना अटक केली. त्यापैकी एकाला सऊदी अरेबियातून भारतात आणले आहे.

- यापैकी पहिला संशयित सय्यद मोहम्मद झिशान अली याला विशेष पोलिस शाखेने अटक केली. त्याला नुकतेच सऊदी अरेबियाहून भारतात आणले गेले. भारताच्या विमानतळावर पाय ठेवताच त्याला अटक करण्यात आली. 
- दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात वर्षभरापूर्वी लुक-आऊट नोटीस काढली होती. 2015 मध्ये अल-कायदा इंडियन सब-कॉन्टिनेंट च्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासूनच पोलिस त्याचा शोध घेत होते. 
- दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी यास अधिकृत दुजोरा दिला आहे. 
- दुसऱ्या संशयिताचे नाव रझा उल-अहमद असे आहे. त्याचा सुद्धा अल-कायदाशी संबंध असल्याचे आरोप आहेत. दिल्ली पोलिसांनी पश्चिम बंगाल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला अटक केली आहे. अहमदने बांग्लादेशच्या अन्सारुल्ला बांगला या कुख्यात अतिरेकी संघटनेत सुद्धा काम केल्याचा पोलिसांना संशय आहे.
बातम्या आणखी आहेत...