आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Army Jawans Killed In Firing By Pak Rangers Along The LoC In Gurez Sector

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, LOC वर दोन जवान शहीद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानने सोमवारी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. दक्षिण काश्मीरमधील गुरेज सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सने दुपारी साडेबारा ते पावणे दोन वाजेदरम्यान अंदाधुंध गोळीबार केला. एलओसीवरील बीएसएफच्या चौक्यांवर निशाणा साधला. यात दोन भारतीय जवान शहीद झाले आहेत.

सोमवारी सहा दिवसांनंतर पुन्हा एकदा पाकिस्तानकडून एलओसीवर गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यापूर्वी 27 ऑक्टोबरला बीएसएफ व पाक रेंजर्सदरम्यान शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याच्या मुद्द्यावर फ्लॅग मिटिंग झाली. त्यात पाकिस्तानने सीमेवरील गोळीबार थांबवणे व शस्त्रसंधीच्या नियमांचे पालन करण्याचे वचन दिले होते.

भारताने केला कडाडूण विरोध...
मागील आठवड्यात दोन्ही देशांमध्ये फ्लॅग मिटिंग झाली. पाकिस्तानकडून वारंवार होणार्‍या शस्त्रसंधीचा भारत सरकारने निषेध नोंदवला होता. आयजी पातळीवर फ्लॅग मीटिंग झाली. आयजी बीएसएफ राकेश कुमारने सांगितले की, पाकिस्तान वारंवार सीमेवर गोळीबार करून शस्त्रसंधीच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानने सीमेवरील घुसखोरी व गोळीबार थांबवावा, असे स्पष्‍ट शब्दात सांगण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर सोमवारी (2 नोव्हेंबर) पाकिस्तानी जवानांनी सीमेवर अंदाधुंद गोळीबार केला यात दोन जवान शहीद झाले आहेत.

खुद्द पाकने बोलावली होती फ्लॅग मीटिंग
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पाक रेंजर्सचे डीजी मेजर जनरल उमर फारूक बुर्की यांनी सीमावर्ती भागात झालेल्या नुकसानाचा हवाला देत बीएसएफचे डीजी डी.के.पाठक यांना फोन करून फ्लॅग मीटिंग बोलावली होती. दोन्ही देशाच्या अधिकार्‍यांमध्ये 27 ऑक्टोबरला सीमेवर वारंवार होणार्‍या मुद्द्यावर चर्चा झाली होती.