आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Cops Shunted Over Glitches At PM's Oath Ceremony

मोदींच्या शपथग्रहण सोहळ्यात माजी राष्ट्रपती राहिले तहानलेले, दोन पोलिस अधिका-यांची बदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यातील अव्यवस्थेच्या कारवाईची कु-हाड दिल्लीच्या दोन वरिष्ठ पोलिस अधिका-यांवर कोसळली आहे. 26 मे रोजी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात झालेल्या भव्य कार्यक्रमातील अव्यस्थेच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार, सोहळ्यासाठी उपस्थित व्हिव्हिआयपी पाहुण्यांनी या तक्रारी केल्या होत्या.
पाणी देखील मिळाले नाही
एक इंग्रजी वृत्तपत्रानुसार, शपथग्रहण समारंभात सुरक्षा यंत्रणेने पाहुण्यांना पाणी पाऊच देण्यावर एनवेळी बंदी आणली. त्यासाठी कारण देण्यात आले, की विरोध प्रदर्शन करण्यासाठी त्याचा वापर होऊ शकतो. पोलिसांनी व्हिव्हिआयपी एरियापासून 100 मीटरवर पाण्याची व्यवस्था केली होती, त्यामुळे एक माजी राष्ट्रपती तहानलेले असताना पाणी पिऊ शकले नाही. यामुळे दोन वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बदल करण्यात आली आहे.
पार्किंगमध्येही झाला त्रास
शपथग्रहण सोहळ्यात पाहुण्यांना पिण्याचे पाणी मिळाले नाही, तर सोहळा संपूण परत जाण्यासाठी निघालेल्या निमंत्रीतांना त्यांच्या कारपर्यंत पोहोचणे एक दिव्य ठरले. अनेक व्हिव्हिआयपींना कार येईपर्यंत ताटकळत उभ राहावे लागले.
एका पोलिस अधिका-याने इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, आगंतुक पाहुण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची किंवा वैद्यकीय सुविधेची सोय नव्हती. एका उद्योगपतीच्या मुलाला अचानक त्रास जाणवाल्या लागल्याने अखेर केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी त्याच्यासाठी अँबुलन्स मागवावी लागली.