नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा शपथविधी 26 मे रोजी झाला होता. या सोहळ्यात नियोजन चुकल्यामुळे काही व्हीआयपींना त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यासंदर्भात अनेक तक्रारीही मिळाल्या होत्या, असे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे या प्रकरणी कारवाई करण्यात आली असून, दिल्ली पोलिसांच्या दोन वरिष्ठ अधिका-यांची बदली करण्यात आली आहे.
पाण्यासाठी व्हीआयपींच्या घशाला कोरड
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शपथविधी सोहळ्यामध्ये सुरक्षेची जबाबदारी सांभाळणा-या दिल्ली पोलिसांनी पाहुण्यांना पाण्याचे पाऊच न देण्याचा निर्णय घेतला होता. विरोध दर्शवण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो असे कारण त्यासाठी देण्यात आले होते. त्यामुळे व्हीव्हीआयपी पाहुण्यांपासून 100 मीटर अंतरावर पाण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. त्यामुळे अनेकांना तहानलेलेच रहावे लागले. यामध्येच दोन माजी राष्ट्रपतींचा समावेश होता असेही सुत्रांनी सांगितले. तर एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाला उन्हं लागल्यामुळे राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुढील स्लाईडवर वाचा...केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केले उद्योगपतीच्या मुलावर उपचार