आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये मतदानाआधी नक्षली हल्ला, CRPF चे दोन जवान शहीद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा / मुंगेर - लोकसभा मतदानाच्या तिस-या टप्प्यात बिहारमध्ये मतदानाला सुरवात होण्याआधी नक्षलवाद्यांनी मुंगेर येथे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
हवेली खडगपूर येथील भीम बांध येथे नक्षलवाद्यांनी भुसूरुंगाचा स्फोट घडवून आणला. यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले असून सात जवान जखमी आहेत.
बिहारमधील जुमाई मतदारसंघात जवान मतदारसंघातील हवेली खडगपूर येथे जवान मतदान करवून घेण्यासाठी चालले होते, तेव्हाच नक्षलवाद्यांनी भुसूरंग स्फोट घडवून आणला. यात दोन जवान शहीद झाले आहेत. जखमींना भागलपूर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या स्फोटात शहीद झालेल्यांमध्ये रविंद्र कुमार राय हे बिहारचे रहिवासी होते. तर, दुसरा जवान कर्नाटकमधील होता सोने गौरव असे त्याचे नाव आहे.
दुसरीकडे, लखीसराय येथे नक्षलवाद्यांनी शाळेवर हल्ला केला. यात जीवित हानी नाही. मात्र, लोक भयभीत झाले आहेत. येथे काही जिवंत बॉम्ब सापडले आहेत. ते निष्क्रिय करण्यासाठी बॉम्ब पथकाला पाचारण करण्यात आले आहे. गया येथे 20 किलो स्फोटके सापडल्याची माहिती आहे.