आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेटलींनी केली ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा, पक्षाचा प्रतिसाद चांगला : शांताकुमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे नेते अरुण जेटली यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांची भेट घेतल्याबद्दल ज्येष्ठ नेते शांताकुमार यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘पक्षाचा प्रतिसाद चांगला, आहे. जेटलींनी अडवाणी, जोशींची भेट घेतली. चर्चा सुरू झाली आहे, ती सुरूच राहावी. मी समाधानी आहे.’

यशवंत सिन्हा यांची अडवाणी, जोशींशी चर्चा : यशवंत सिन्हा यांनी शुक्रवारी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मात्र त्यांनी माध्यमांशी काहीही बोलण्यास नकार दिला. ते म्हणाले, ‘मी दोघांची भेट घेतली पण सांगण्यासारखे काहीही माझ्याकडे नाही.’

ज्येष्ठ नेत्यांच्या मताचा पक्ष आदरच करणार
ज्येष्ठ नेत्यांनी आपली मते जाहीरपणे मांडायला नको होती. त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडायला हवी होती. पक्ष त्यांच्या मताचा, चिंतेचा आदर करेल.
- व्यंकय्या नायडू, केंद्रीय मंत्री, बंगळुरूत

कारवाईची मागणी कोणीही केली नव्हती
अडवाणी, जोशी हे आदरणीय नेते आहेत. त्यांच्यासह चौघांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी मी अथवा इतर कोणत्याही नेत्याने केली नव्हती.
-नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, नागपुरात

जबाबदारी निश्चित करा : बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी निश्चित करावी.व पक्षाच्या पराभवाचा आढावा घ्यावा, अशी मागणी खासदार आर. के. सिंह यांनी निवेदनाद्वारे केली. सिंह म्हणाले, या निवडणुकीत कोणाची भूमिका चुकली, त्यासाठी कोण जबाबदार आहे, हे सर्वांना समजायला हवे. पक्षाच्या मार्गदर्शक मंडळातील चारही ज्येष्ठ नेत्यांचीही हीच मागणी आहे.
बातम्या आणखी आहेत...