नवी दिल्ली - टूजी घोटाळ्यातील आरोपी माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, द्रमुकचे प्रमुक करुणानिधी यांची पत्नी दयालू अम्मा, मुलगी कनिमोझी यांच्यासह 19 आरोपींना विशेष सीबीआय न्यायालयाने 26 मे रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
टूजी घोटाळ्याशी संबंधित पैशांच्या अफरातफरीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्राच्या सुनावणीवेळी न्यायालयाने समन्स जारी केले. पुढील तपास सुरू ठेवण्याच्या दृष्टीने ईडीकडे ठोस पुरावा आहे, असे सांगून न्यायाधीश ओ. पी. सैनी यांनी या प्रकरणी तपास सुरू ठेवण्यासही परवानगी दिली. ईडीने 25 एप्रिल रोजी आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये दहा व्यक्ती आणि नऊ कंपन्यांना आरोपी करण्यात आले आहे. आरोपींमध्ये शाहिद बलवा,विनोद गोएंका,आसिफ बलवा,राजीव अग्रवाल,करीम मोरानी यांचाही समावेश आहे.