आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Suspected Let Terrorists Held At Venue Of I Day Parade In Jammu

महिलेच्‍या वेशात टेहळणी करणारे दोन दहशतवादी पकडले; पोलिसांची कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - जम्‍मू काश्‍मीरमधील किश्तवाड येथील ज्‍या मैदानावर स्‍वातंत्र दिन सोहळा आयोजित केला आहे त्‍या मैदानाची टेहळणी करत असलेल्‍या दोन संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्‍यांनी बुरखा परिधान केलेला होता. जमाल दिन आणि अब्दुल करीम अशी त्‍यांची नावे असून, ते केशवान ठकराई येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, 2011 मध्‍ये चकमकीत ठार झालेला लष्‍कर-ए-तय्यबाचा दहशतवादी हबीब गुज्जर याचे ते भाऊ आहेत. यापैकी जमाल याला यापूर्वीसुद्धा संशययाच्‍या आधारावर पकडण्‍यात आले होते. पण, पुराव्‍याअभावी त्‍याची मुक्‍तता करण्‍यात आली होती.
सूत्रांनुसार, जमाल याने लेडीज सूट आणि बुरका परिधान केलेला होता. शिवाय पायात लेडीज बुटही होते. संशय आल्‍याने पोलिसांनी त्‍याला ताब्‍यात घेतले. जम्‍मू काश्‍मीरमध्‍ये दहशवातवादी कारवाया वाढल्‍या असून, उधमपूरमध्‍ये बीएसएफ जवानांवर हल्‍ला झाला होता. त्‍यामुळे पोलिस सर्तक झाले आहेत.
पंजाबमधून 265 काडतूस जप्‍त
पंजाबमधील लुधियाना पोलिसांनी बुधवारी 265 जिंवत काडतूस जप्‍त केले. ते शहरातील सिव्हिल लाइन्‍स परिसरात असलेल्‍या एका शाळेजवळ कुणीतरी फेकले होते. शिक्षकांकडून याची माहिती मिळताच पोलिसांनी ते जप्‍त केले. ते एके 47 सह भिन्न बुदंकीमध्‍ये वापरले जाऊ शकतात.