आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 2 Ugandan Women Share Woes With Delhi Commission For Women

'भारतामध्ये अफ्रिकन महिलांना वेश्या समजले जाते', युगांडाच्या महिलांनी आयोगाला सांगितले दुःख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कायदा मंत्री सोमनाथ भारती यांच्या विरोधात तक्रार करणा-या युगांडाच्या दोन महिलांनी दिल्ली महिला आयोगासमोर मन मोकळे केले आहे. पीडित महिला म्हणाल्या, 'भारतात आम्हाला वर्णभेदाच्या वाईट अनुभवाला सामोरे जावे लागते. या माझ्या एकटीच्या किंवा दिल्लीतील अफ्रिकन महिलांच्या भावना नाहीत, तर भारतात असलेल्या अफ्रिकन वंशांच्या सर्व महिलांच्या वतीने मी बोलत आहे.'
महिला आयोगाकडे तक्रार करणारी युगांडाची महिला म्हणाली, 'आमच्या शेजा-यांनी केलेली तक्रार मी वाचली आहे. त्यात लिहिले आहे, की अश्वेत महिला महागड्या कारमध्ये ये-जा करते. जर मला माझे भारतीय मित्र महागड्या कारमध्ये सोडायला येत असतील तर मी वेश्या आहे का? तक्रारीत म्हले आहे, की आम्ही रात्री उशिरा पर्यंत घराबाहेर असतो. कोणही सांगावे भारतात रात्री घरी परत येण्याची निश्चित वेळ काय आहे? आणखी पुढे त्या तक्रारीत आमच्यावर आरोप करण्यात आला आहे की, आमच्या खिश्यात कंडोमची पाकिटे असतात. तुम्हीच सांगा भारतात कंडोमची पाकिटे जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे का? जर तसे असेल तर मेडिकलवर त्यांची विक्री का केली जाते? प्रत्येक अफ्रिकन महिला ही वेश्याच असते का?
पुढील स्लाइडवर वाचा पूर्ण बातमी