आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यसैनिकांच्या मासिक पेन्शनमध्ये २० टक्के वाढ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने स्वातंत्र्यसैनिकांच्या मासिक पेन्शनमध्ये २० टक्के म्हणजेच सुमारे ५००० रुपये वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. सर्व श्रेणीतील स्वातंत्र्यसैनिक, दिवंगत स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवा पत्नी आणि त्यांच्या आश्रितांना २० टक्के पेन्शन वाढ देण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

स्वातंत्र्यसैनिकांची सुधारित पेन्शन १५ ऑगस्ट २०१६ पासून अमलात येईल. सध्याची महागाई
मदतप्रणाली औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित असून तीच पेन्शनधारक स्वातंत्र्यसैनिकांसाठीही लागू आहे. मात्र, यात सुधारणा करून आता महागाईसाठी देण्यात येणाऱ्या मदतीची ही पद्धत नवा नियम लागू करून बंद करण्यात आली अाहे. आता नव्या पद्धतीमध्ये केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली आणि वर्षातून दोन वेळा मिळणारी महागाई भत्ताप्रणाली पेन्शनधारक स्वातंत्र्यसैनिकांनाही लागू करण्यात आली आहे. या प्रणालीला ‘महागाई मदत’ संबोधले जाईल. देशात सध्या १,७१, ६०५ पेन्शनधारक स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांचे वारस आहेत.
बातम्या आणखी आहेत...