आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवघेणा संघर्ष: मराठा अारक्षणासाठी दिल्लीत 20 विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र मराठा आरक्षण विद्यार्थी कृती समितीचे २० कार्यकर्ते शुक्रवारपासून कडाक्याच्या थंडीत जंतरमंतरवर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. मराठवाड्यातील या अांदाेलकांना दिशा देणारे नेतृत्व नाही. गेल्या चार दिवसांत तीन जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. तशातही हे विद्यार्थी आंदोलन रेटत आहेत. सोमवारी आंदोलनाचा चौथा दिवस होता.
मराठा आरक्षण न्यायालयाने रद्दबातल ठरवले. त्यास राज्य सरकारने अाव्हान न दिल्याने कृती समितीच्या बॅनरखाली अाैरंगाबादचे अविनाश खापे पाटील, कुणाल गुजर, दिनेश अहेर, उस्मानाबादचे वैभव माेरे, नितीन जाधव, शुभम राखुंडे, संकेत हरवले, शंतनू खंदारे, प्रसाद पवार, लातूरचे सुशील काळे, बीडचे शिवराज काेळसे, सतीश झिरपे, हिंगाेलीचे समाधान थाेरात, गजानन पाटील, कृष्णा भाेसले, परभणीचे भारत पवार व भागवत शिंदे सहभागी अाहेत.
आंदोलन मागे घेण्याचे विखेंचे आवाहन
विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करू. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी सक्षम वकिलाच्या नियुक्तीसाठी सरकारला भाग पाडू. तोवर आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन विखेंनी केले.
सरकारने दुर्लक्ष केले तर विद्रोह करू : खापे
हार्दिक पटेल यांची नवनिर्माण सेना, दिल्लीचा पटेल समाज, हरियाणाचे मराठा समाज यांचा पाठिंबा या अांदाेलनाला मिळत असल्याची माहिती अविनाश खापे यांनी दिली; परंतु यातील काेणीही उपाेषणस्थळावर हजर नाही. सरकार अामच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असल्यास अाम्ही विद्राेह करू शकताे, तशी मानसिक तयारी करीत अाहाेत, असा इशाराही या विद्यार्थ्यांनी दिला अाहे.