नवी दिल्ली- मराठा आरक्षणासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर महाराष्ट्र राज्य मराठा अारक्षण विद्यार्थी कृती समितीच्या बॅनरखाली मराठवाड्यातील २० विद्यार्थ्यांनी सुरु केलेल्या उपाेषण अांदाेलनाची बुधवारी सांगता करण्यात अाली. मात्र, महाराष्ट्रात जिथे सरकारचे कार्यक्रम अायाेजित करण्यात येतील ते उधळण्याचा निर्णय यावेळी घेण्यात अाला.
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जितेंद्र अाव्हाड यांनी अाज जंतरमंतरवर अांदाेलन स्थळाला भेट देऊन महाराष्ट्रातील अांदाेलनाची रणनिती कशी असावी, याबाबत विद्यार्थ्यांना मागदर्शन केले. १५ जानेवारपासून कडाक्याच्या थंडीत हे विद्यार्थी उपाेषणाला बसले हाेते. त्यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात अाले हाेते. या उपाेषणात अाैरंगाबादचा अविनाश खापे पाटील, कुणाल गुजर, दिनेश अहेर, उस्मानाबादचे वैभव माेरे, नितीन जाधव, शुभम राखुंडे, संकेत हरवले, शंतनू खंदारे, प्रसाद पवार, लातूरचा सुशील काळे, बिडचे शिवराज काेळसे, सतीश झिरपे, िहंगाेलीचे समाधान थाेरात, गजानन पाटील, कृष्णा भाेसले, परभणीचे भारत पवार व भागवत शिंदे सहभागी झाले हाेते.
या अांदाेलनाचे संयाेजक अविनाश खापे पाटील यांनी हा राज्यातील साडेतीन काेटी मराठा-कुणबी समाजाचा प्रश्न असल्याकडे लक्ष वेधले. महाराष्ट्रातील ८२ टक्के शेतकरी हे मराठा समाजाचे अाहेत. त्यातील ७० टक्के अल्पभुधारक व ४ टक्के भूमीहीन अाहेत. अाघाडी सरकारच्या काळात या अारक्षणाला मान्यता देण्यात अाली हाेती. मात्र, न्यायालयाने या विराेधात निकाल दिल्याने भाजप सरकारने बाजू मांडणे अपेक्षित हाेते. परंतु हे सरकार केवळ ताेंडाला पाने पुसणारे असून कर्तव्य शून्य असल्याचा अाराेपही विद्यार्थ्यांनी केला अाहे.