आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 20 Times More Polluted Diwali Night In Delhi Effect Hangs In Air

दिवाळीच्या रात्री देशभरात प्रदूषणाच्या पातळीत वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशभरात दिवाळीच्या रात्री झालेल्या फटाके आणि आतषबाजीमुळे वायू प्रदूषणाच्या पातळीत वाढ झाली आहे. दिल्लीसारख्या महानगरांमध्ये हवा जणू विषारी बनल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रदूषक घटकांचे प्रमाण सामान्याहून तुलनेने २० पट अधिक असल्याचे आढळून आले.

प्रदूषक घटकांची सुरक्षित पातळी १०० मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर अशी मानली जाते. परंतु दिल्लीच्या अनेक भागांत हा स्तर २००० हून अधिक आहे. हानिकारक घटकांचे प्रमाण ४०० ते ७५० मिलिग्रॅमपर्यंत पोहाेचला आहे. वास्तविक ही पातळी ६० पर्यंत असली पाहिजे. दिवाळीच्या दरम्यान हवा गुणवत्ता निगराणी भौतिक विज्ञान मंत्रालयाच्या सिस्टिम फॉर एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) या संस्थेने केली आहे.

देशाची स्थिती
चंदीगडमध्ये वायू प्रदूषण गेल्या वर्षीच्या तुलनेत (२६०) १८९ मायक्रोग्रॅम प्रतिक्युबिक मीटर होते. गुरुवारी रात्री ९ ते १० पर्यंत ध्वनिप्रदूषणाची पातळी ८.५ डेसिबलपर्यंत पोहोचली होती. गेल्या वर्षी दिवाळीत ८२.९ डेसिबल होती. लखनऊमध्ये फटाक्यांचा आवाज २१ टक्क्यांनी घटला. सिमल्यात प्रदूषण दीडपटीने वाढले. भोपाळमध्ये त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली.