नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या स्पाइसजेट विमान कंपनीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी क्रेडीटवर इंधन देण्यास नकार दिल्याने स्पाइसजेटचे जवळपास 200 विमानांची उड्डाणे आज (ता.17) रद्द करण्यात आली आहेत.
तेल कंपन्यांनी स्पाइसजेटकडून आधीची थकबाकी रक्कम देण्याची मागणी केली आहे. ती भरल्यानंतर पुन्हा इंधन पुरवण्यात येईल असा पवित्रा तेल कंपन्यांनी घेतल्यामुळे कलानिधी मारन यांच्या मालकिच्या स्पाइसजेटला इंधनाचा पुरवठा होऊ शकला नाही.
सरकारतर्फे स्पाइसजेटला या कंपनीला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून दोन आठड्यांचे क्रेडिटवर इंधन देण्याची घोषणा केली होती मात्र अद्याप त्यावर कोणतेच ठोस पाऊन उचलले गेलेले नाही.
धुक्यामुळे थांबली दिल्लीतील अनेक उड्डाणे
दिल्लीतील बुधवारची सकाळ दाट धूक्यांची चादर ओढण्यात आलेल्या चादरी सारखी झाली. यामुळे इंदिरा गांधी इंटरनॅशनल एयरपोर्टवरून साधारण 50 विमानांची उड्डाणे उशिराने सोडण्यात आली. तर अनेक विमानांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. तर, जेट एअरवेजचे 4 विमाने रद्द करण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.