आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

SHOCKING: हैदराबादेत 2000च्या तर मुंबईत 500च्या बनावट नोटा जप्त; 6 जणांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/हैदराबाद- 500, 1000च्या नोटा चलनातून बाद करण्‍याच्या न‍िर्णयामागे बनावट नोटांना आळा बसणे आणि भ्रष्टाचार रोखणे हा मोदी सरकारचा मूळ उद्देश आहे. या निर्णयाला 19 दिवस होत नाही तोच, 2000 आणि 500 बनावट नोटा चलनात आल्याचे धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हैदराबाद पोलिसांनी केलेल्या छापेमारीत 6 जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 2000 च्या तब्बल 2 लाखांंच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. आरोपींकडून 100, 50, 20 आणि 10 रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन 2 कलर झेरॉक्स मशीन पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा त्यांचा कट होता. या रॅकेटचा म्होरक्याचा खाटीकचा धंंदा असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत.

2000 च्या नव्या नोटा नुकत्याच चलनात आल्या आहेत. खरी कुठली आणि बनावट कुठली, हे समजणे फारच कठीण आहे. याचा फायदा काही लोक घेत असून ते बनावट नोटा चलनात आणत आहे.

मुंबईत सापडली 500ची बनावट नोट
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत 500 ची बनावट नोट चलनात आल्याचे समोर आले आहे. कल्याणमधील एका दुकानात 500 ची बनावट नोट चालवण्यात आली आहे. दुकानदाराने सांगितले की, काही कामानिमित्त ते बाहेर गेले होते. दुकानात त्यांची आई बसली होती. एक अज्ञात व्यक्तीने आईला पाचशे रुपयाची नोट देऊन किराणा सामान व काही सुटे पैसे घेऊन गेला. पण ही नोट बनावट असल्याचे लक्षात येताच दुकानदाराने पोलिसांत तक्रार नोंदवली आहे.

दुसरीकडे, मुंबई एअरपोर्टवर कस्टम विभागाने एका प्रवाशाच्या बॅगेतून 2000च्या 350 नव्या नोटा (साडे सात लाख रुपये) आणि 7 किलो सोन्याचे बिस्किट व नाणे जप्त केले आहेत. या प्रवाशाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, मोदींच्या गुजरातमध्येच आढळली 2,000 रुपयांची बनावट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...