आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली स्फोट: 1 दोषी, दोघे निर्दोष; दोषी तारिक अहमद दारचीही सुटका करण्याचे कोर्टाचे आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राजधानीत सन 2005 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आराेपींपैकी फक्त तारिक अहमद दार याला न्यायालयाने दोषी ठरवले. उर्वरित दोन आरोपींची निर्दोष सुटका केली. दारही केवळ बेकायदा कारवायाप्रकरणी दोषी ठरला आहे. या गुन्ह्यात जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून त्याने यापेक्षा अधिक काळ तुरुंगात घालवल्यामुळे त्याची तत्काळ सुटका होणार आहे.
 
या प्रकरणात मोहंमद रफिक आणि मोहंमद फाजली या दोघांना निर्दोष ठरण्यात आले. सन 2005  मध्ये दिवाळीपूर्वी दोन दिवस 29 ऑक्टोबरला राजधानीत भरबाजारात तीन बॉम्बस्फोट झाले होते. यातील पहिला स्फोट पहाडगंजमध्येे भरबाजारात, दुसरा स्फोट गोविंदगुरी भागात परिवहन महामंडळाच्या बसमध्ये, तर काही मिनिटांतच तिसरा स्फोट सरोजनी नगर बाजारात झाला.
 
तारिक अहमद होता ‘लष्कर’चा प्रवक्ता
विशेष तपास पथकानुसार तारिक अहमद दार हा लष्कर-ए-तोयबाचा प्रवक्ता म्हणून काम करत होता. मात्र, त्याने दिल्लीतील स्फोटांनंतर बीबीसीला फोन करून या कारवाईत लष्करचा हात नसल्याचे सांगितले होते.  

दिल्ली स्फोटानंतर 80 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या बस चालकाची कहाणी आणि स्फोटानंतरचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...