आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Delhi Blast: चालकाने वाचवले 80 लोकांचे प्राण, व्हिडिओतून पाहा 2 जिगरबाजांची कहाणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलासोबत बस चालक कुलदीप सिंह - Divya Marathi
मुलासोबत बस चालक कुलदीप सिंह
नवी दिल्ली- राजधानीत सन 2005 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील आरोपींपैकी फक्त तारिक अहमद दार याला कोर्टाने दोषी ठरवले आहे. उर्वरित मोहम्मद रफिक आणि मोहंमद फाजली या दोघांना निर्दोष ठरण्यात आले. दारही केवळ बेकायदा कारवायाप्रकरणी दोषी ठरला आहे. या गुन्ह्यात जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद असून त्याने यापेक्षा अधिक काळ तुरुंगात घालवल्यामुळे त्याची तत्काळ सुटका होणार आहे.

सन 2005 मध्ये दिवाळीपूर्वी दोन दिवस 29 ऑक्टोबरला राजधानीत भरबाजारात तीन बॉम्बस्फोट झाले होते. यातील पहिला स्फोट पहाडगंजमध्ये भरबाजारात, दुसरा स्फोट गोविंदगुरी भागात परिवहन महामंडळाच्या बसमध्ये, तर काही मिनिटांतच तिसरा स्फोट सरोजनी नगर बाजारात झाला. या सीरियल ब्लास्ट्‍समध्ये 67 जणांचा मृत्यू झाला होता, तर 225 पेक्षा जास्त जखमी झाले होते.

दरम्यान, दिल्लीत 2005 मध्ये 3 ठिकाणी झालेल्या  दिल्ली ब्लास्ट जरी उच्चारले तर दोन जणांचे चेहरे चटकण समोर येतात. त्यातील पहिला व्यक्ती म्हणजे, बस चालक कुलदीप सिंह. कुलदीप यांनी या स्फोटात डोळे गमावले. मात्र, 80 लोकांचे प्राण वाचवले होते.

दुसरी व्यक्ती- ज्यूस विक्रेता मालिक लालचंद सलूजा. लालचंद यांनी दिल्ली स्फोटाने बळी घेतला. मात्र, त्यांनी अंतिम श्वासापर्यंत अनेकांचे प्राण वाचवले होते. आज आम्ही आपल्यासाठी या दोन जाबाजांची शौर्यगाथा घेऊन आलो आहे. चला तर मग जाणून घेऊया... कुलदीप सिंह आणि लालचंद सलूजा यांची कहाणी...

दिल्ली स्फोटानंतर 80 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या बस चालकाची कहाणी आणि स्फोटानंतरचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...