आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 2016 Persons Of The Year Donald Trump, While PM Narendra Modi Won The Readers Poll

ट्रम्प बनले TIME पर्सन ऑफ द ईयर, रिडर्स पोलमध्ये 11% जास्तीचे वोट मिळवून जिंकले होते मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यूएसचे प्रेसिडेंट इलेक्ट डोनाल्ड ट्रम्प टाईम मॅगझिनचे 'पर्सन ऑफ द ईयर' बनले आहेत. या शर्यतीत पंतप्रधान नरेंद्र मोदीसुध्दा होते. मोदी टाइम पर्सन ऑफ द ईयरचा ऑनलाइन रीडर्स पोल जिंकले आहेत. त्यामध्ये त्यांना ट्रम्पपेक्षा 11% जास्तीचे वोट आहेत. जर मोदी जिंकले असते तर हा मान मिळवणारे ते दुसरे भारतीय ठरले असते. यापूर्वी 1930 मध्ये महात्मा गांधी यांना टाइम पर्सन ऑफ द ईयर निवडण्यात आले होते. यंदाच्या टाइम पर्सन ऑफ द ईयर सेकंड रनरअप हिलेरी क्लिंटन या होत्या. हिलेरी या यूएस प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये ट्रम्प यांच्या विरोधात होत्या. मात्र त्या निवडणूक जिंकू शकल्या नाही. टाइमने ट्रम्प यांना का निवडले...

- ट्रम्प यांच्या निवडीबद्दल टाईममध्ये लिहिण्यात आले आहे की, एक अँटी-एस्टॅब्लिशमेंट व्यक्ती आणि पॉपुलिस्ट कॅंडिडेट म्हणून कॅम्पेन चालवल्यानंतर 70 वर्षांचे ट्रम्प यूएसचे 45 वे प्रेसिडेंट म्हणून निवडून आले. त्यांनी निवडणूक जिंकून त्यांच्या अभियानाला अत्यंत उत्कृष्टपणे पुर्णत्वास नेले.
- तसेच ट्रम्प म्हणाले की, ही एक सन्मानाची गोषअट आहे. कारण की मी टाईमला वाचतच मोठा झालो आहे.

ट्रम्प यांनी पहिलेच लिक केला होता का निकाल?
- ट्रम्प यांनी टाइम पर्सन ऑफ द ईयर चा निकाल लागण्यापूर्वीच ट्वीट केले होते. हे ट्वीट असे होते ''7.30 वाजता @TODAYshowमध्ये माझी मुलाखत येणार"
- यामुळे असा प्रश्न उपस्थित झाला की, ट्रम्प यांना माहित होते की, ते निवडून आले आहेत. यामुळेच त्यांची मुलाखत निश्चित झाली आणि माहिती लिक झाली.
- मात्र त्यांना याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ते म्हणाले की, हे मॉडर्न-डे कम्युनिकेशन आहे. यामध्ये काहीही चुकीचे नाही.
बातम्या आणखी आहेत...