आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीजिंग- चीनच्या शिनझियांग प्रांतात एका कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 21 खाणकामगारांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. चीनची सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, बियांगगोऊ कोळसा खाणीत हा स्फोट झाला. घटना घडली त्यावेळी 34 जण काम करत होते. 12 कर्मचारी खाणीबाहेर कसेबसे बाहेर पडले. परंतु, 22 जण आतच अडकले. त्यानंतर आणखी एका कामगाराला प्राण वाचविण्यात यश मिळाले. परंतु, 21 जण दुर्दैवी ठरले.
चीनमध्ये खाणतील सुरक्षा व्यवस्था अतिशय खराब आहे. त्यामुळे असे अपघात सतत होत असतात. गेल्या वर्षी कोळसा खाणीतील स्फोटांमध्ये 1384 लोकांचा मृत्यू झाला होता. कंपन्यांकडून मृतकांचा आकडा कमी सांगण्यात येतो. चीनच्या खाणी जगात सर्वाधिक असुरक्षित आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या भीषण अपघाताशी संबंधित छायाचित्रे...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.