आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२१ हजारांपर्यंत मूळ पगार असणार्‍यांना बोनस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्व आर्थिक आघाड्यावर चांगली परिस्थिती राहिली तर तर दिवाळीला केंद्र सरकार कर्मचार्‍यांना तगड्या बोनसची भेट देऊ शकेल. सरकार बोनसची रक्कम वाढवण्याच्या व पगाराची मर्यादा वाढवून बोनसची कक्षा रुंदावण्याच्या तयारीत आहे.

सध्या मूळ पगार आणि महागाई भत्ता जोडून १० हजार रुपये प्रति माह वेतन घेणार्‍या कर्मचार्‍यांना बोनस दिला जातो. वेतनमर्यादा वाढवून २१ हजार रुपये प्रति माह करण्याचा कामगार आणि रोजगार मंत्रालयाचा प्रस्ताव आहे. दुसरीकडे ३५०० रुपये कमीत कमी बोनस मर्यादा वाढवून ७००० रुपये करण्याच्या हालचाली सुरू आहेत. संबंधित तरतूद पेमेंट ऑफ बोनस अ‍ॅक्टमध्ये दुरुस्ती करून समाविष्ट केली जाईल. सरकारच्या या पुढाकाराचा फायदा सरकारी आणि खासगी कर्मचार्‍यांनाही मिळेल. याअंतर्गत सध्याच्या कर्मचारी आणि कंपनीशी संबंधित ४५ कायद्यांची जागा पाच कायदे घेतील. यामध्ये मंत्रालयाने इंडस्ट्रियल रिलेशन आणि लेबर कोड ऑन व्हेजेसचा आराखडा तयार केला आहे.
बातम्या आणखी आहेत...